मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला टी-20 सामना धमाकेदार शैलीत जिंकला होता. दुसरा टी 20 सामना हातून गेला. पण टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथ्या T20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
पहिल्या तीन सामन्यात रोहित आणि सूर्यकुमार यादवने ओपनिंग केली होती. सूर्यकुमारची कामगिरी चांगली राहिली आहे. रोहित शर्माही दुखापतीमधून सावरला आहे. तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर की दीपक हुड्डा कोणाला खेळण्याची संधी मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रेयस अय्यर तिसऱ्या स्थानावर उतरून चांगली कामगिरी करू शकला तर विराटची जागा धोक्यात येऊ शकते.
हार्दिक पांड्या आणि पंतला विशेष कामगिरी करण्यात यश आलं नाही. पण चौथ्या सामन्यात पुन्हा या दोघांना खेळवणार आहे. दिनेश कार्तिककडे फिनिशरची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्याने 19 बॉलमध्ये 41 धावा केल्या ज्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी बळ मिळालं. त्याला सहाव्या क्रमांकावर उतरवण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या टी 20 सामन्यात रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली होती. आता चौथ्या सामन्यात तो पुन्हा मैदानात खेळताना दिसेल. श्रेयस अय्यर खेळणार की नाही याकडेही लक्ष असणार आहे. बॉलिंगमध्ये रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी पुन्हा मैदानावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळू शकते.
हे दोन्ही खेळाडू किफायतशीर गोलंदाजीत करतात. या दोघांच्या घातक बॉलिंगसमोर टिकणं विरोधी टीमसाठी मोठं आव्हान असतं. भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीची जबाबदारी निभावताना दिसणार आहे. त्याला साथ देण्यासाठी अर्शदीप सिंहला टीममध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा.