नवी दिल्ली : पहिली वनडे पावसात धुवून निघाल्यानंतर रविवारी भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सामना रंगतोय. या सामन्यात पावसासोबतच युवराजच्या फॉर्मवर साऱ्यांची नजर असणार आहे.
पहिली वनडे पावसामुळे होऊ शकली नाही. या सामन्यात भारताला पहिल्यांदा फलंदाजी करताना ३९.२ षटके खेळता आली. यात सलामीवीरांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिखऱ धवनने ८७ धावांची खेळी केली तर सलामीवीर अजिंक्य रहाणेने ६२ धावा ठोकल्या. मात्र युवराज सिंगला या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आले.
उद्याच्या सामन्यात पावसाबाबत भाकीत केले जाऊ शकत नाही. मात्र विराटला चिंता सतावतेय ती युवराजच्या फॉर्मची. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये युवराजने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ७, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २३, पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यात २२ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ४ धावा केल्यात. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत कोहलीला चिंता आहे.