मुंबई : टीम इंडिया 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा दुखापतीमधून बरा झाला असून कर्णधार म्हणून तो मैदानात उतरणार आहे. यावेळी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
संघाची निवड करताना एका खेळाडूवर अन्याय झाला आहे. संघ निवडताना एक गोलंदाज मात्र वंचित राहिला आहे. आधी विराट कोहली आणि आता रोहितनंही त्याला संघात स्थान देण्याचा विचार केला नाही असंच दिसत आहे. 150 पेक्षा जास्त वेगानं हा क्रिकेटपटू बॉलिंग करतो.
काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी संधी देण्यात आली नाही. कर्णधार विराट कोहलीच्या काळातही त्याला डावललं जात होतं. आता रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतरही त्याचा संघात निवडीसाठी विचार केला जात नाही. त्यामुळे उमरानच्या नशीबी पुन्हा एकदा निराशा आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर आता या गोलंदाजाची वेस्ट इंडिज विरुद्धही निवड झाली नाही. उमरानने आयपीएलमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि माजी कर्णधार विराट कोहलीचीही या वेगवान गोलंदाजावर नजर होती. त्याला संघात संधी देण्यात आली नाही.
आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा जम्मू-काश्मीरचा धोकादायक गोलंदाज उमरान मलिक याची निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत-अ संघात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. उमरान मलिकने आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. उमरान मलिक 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने चेंडू सातत्याने फेकतो.
बुमराह-शमी त्याच्या जवळही नाहीत
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह देखील सर्वात वेगवान चेंडूंच्या यादीत उमरान मलिकच्या जवळ नाहीत. उमरानने या आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान 155+ चेंडू टाकले. यापूर्वी, आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू 147.68 किमी प्रतितास वेगाने टाकला होता. तिसऱ्या क्रमांकावर हैदराबादचा खलील अहमद आहे ज्याने 147.38 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल.