लागोपाठ ७ वनडे सीरिज जिंकण्याचा भारताचा विक्रम

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ रन्सनं विजय झाला आहे. 

Updated: Oct 29, 2017, 10:04 PM IST
लागोपाठ ७ वनडे सीरिज जिंकण्याचा भारताचा विक्रम  title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ रन्सनं विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ३ वनडेची ही सीरिज २-१नं जिंकली आहे. त्यामुळे लागोपाठ ७ वनडे सीरिज जिंकण्याचा विक्रम भारतानं केला आहे.

२०१६ साली ऑस्ट्रेलियानं भारताचा ४-१नं पराभव केला होता. त्यानंतर भारत सगळ्या वनडे सीरिज जिंकला आहे. घरच्या मैदानामध्ये भारत शेवटची सीरिज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१५ साली हारला होता. दक्षिण आफ्रिकेनं भारताचा ३-२नं पराभव केला होता.

२०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज गमावल्यानंतर भारताचा वनडेमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३-०, न्यूझीलंडविरुद्ध ३-२, इंग्लंडविरुद्ध २-१, वेस्ट इंडिजविरुद्ध ३-१, श्रीलंकेविरुद्ध ५-०, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-१ आणि आता न्यूझीलंडविरुद्ध २-१ असा लागोपाठ ७ सीरिजमध्ये विजय झाला आहे.