तो आला, त्यानं पाहिलं.... त्यानं हात मिळवला; पाहा धोनीचा अनोखा अंदाज

कॅप्टन कूल, माही, किंवा मग धोनी; अशा अनेक नावांनी..... 

Updated: Mar 2, 2020, 08:57 PM IST
तो आला, त्यानं पाहिलं.... त्यानं हात मिळवला; पाहा धोनीचा अनोखा अंदाज
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कॅप्टन कूल, माही, किंवा मग धोनी; अशा अनेक नावांनी भारतीय क्रिकेट संघातील महेंद्रसिंह धोनी हा खेळाडू ओळखला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच धोनीने या विश्वात त्याची वेगळी छाप पाडली. पण सध्या मात्र तो मुख्य प्रवाहातील क्रिकेटपासून काहीसा दूर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वापासून बरेच महिने दूर असणाऱ्या माहिने क्रीडारसिकांसोबतचं त्याचं नातं मात्र कायमस्वरुपी जपलं आहे. अनेकदा याचा प्रत्यय आला आहेच. त्यातच आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ आणखी भर टाकत आहे. 

धोनीच्या नुसत्या कोणत्याही ठिकाणी जाण्यानेही क्रीडारसिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. सानथोरांपासून प्रत्येकाच्याच मनावर राज्य करणाऱ्या या खेळाडूला मनमिळाऊ अंदाज पुन्हा पाहायला मिळत आहे. 

आयपीएल २०२०च्या हंगामातील सरावासाठी धोनी सध्या चेन्नईला पोहोचला आहे. जिथे त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं. सोशल मीडियावरील व्हिडिओच हे सिद्ध करत आहे. जिथे धोनी कारमधून उतरला असता, अनुक एका हॉटेलमधील प्रवेशालाच असणारे व्यक्ती माहिचं हात जोडून मन:पूर्वक स्वागत करताना दिसत आहेत. समोरच्या व्यक्तीन आपलं स्वागत केल्याचं पाहून धोनीने स्वत: पुढे जात त्यांना हात मिळवला. 

 
 
 
 

A post shared by Sam Sarma (@vathsansri) on

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

माहिचा हाच अंदाज तिथे असणाऱ्या अनेकांसोबतच नेटकऱ्यांची मनं पुन्हा एकदा जिंकून गेला. कारकिर्दीत कितीही उंची गाठली असली तरीही कायमच विनम्रतेने वागण्याचा त्याचा हाच स्वभाव इतरांपासून त्याला खास आणि तितकाच वेगळं ठरवतो.