मुंबई : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या भारतीय संघात असलेल्या अनेक खेळाडूंनी आपल्या मुला-मुलींची नावे खुपचं युनिक ठेवली होती. काहींनी खेळाडूचे नाव आणि पत्नीचं नाव जोडून बाळाचे नाव ठेवले होते, तर काहींनी असेच युनिक नाव ठेवले होते, आता या पक्तीक भारताचा आणखीण एक खेळाडू येऊन बसला आहे. कारण या खेळाडूने देखील आपल्या मुलाचे युनिक नाव ठेवले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या मुलाचे नाव खुपच युनिक ठेवले आहे. फादर्स डेच्या निमित्ताने त्याने या गोष्टीचा खुलासा केला होता. 2011 वर्ल्डकप विजेता युवराज आणि त्याची पत्नी हेजल कीच यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'ओरियन कीच सिंग' ठेवले आहे. ट्विटरवर फोटो शेअर करून त्याने या संदर्भातली माहिती दिली.
'या' खेळाडूंनी ठेवली युनिक नावे
भारतीय क्रिकेट विश्वातील युवी हा एकमेव दिग्गज खेळाडू नाही आहे, ज्याने आपल्या मुलाचे युनिक नाव ठेवले आहे. त्याच्या आधीही असे अनेक खेळाडू आहेत,ज्यांनी आपल्या मुलांची नावं अगदी युनिक ठेवली आहेत. टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकूण देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने देखील मुलीचे नाव युनिक ठेवले होते. धोनीने आपल्या मुलीचे नाव 'जिवा' ठेवले आहे. त्याचबरोबर सध्याचा कर्णधार रोहित शर्मानेही आपल्या मुलीचे नाव अदारा ठेवले आहे.भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.
युनिक नावे
सचिन तेंडुलकर - सारा
सौरव गांगुली - सना
विराट कोहली - वामिका
रोहित शर्मा - समायरा
महेंद्रसिंग धोनी - झिवा
ग्रेसियाच्या भूमिकेत सुरेश रैना
हरभजन सिंग - हिनाया