वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. 

Updated: Oct 11, 2018, 05:57 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. आशिया कपमध्ये विश्रांती घेतलेल्या विराट कोहलीचं टीममध्ये पुनरागन झालं आहे. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतलाही टीममध्ये संधी देण्यात आली आहे. फास्ट बॉलर मोहम्मद शमीचीही टीममध्ये निवड झाली आहे.

दिनेश कार्तिक, केदार जाधव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंना या टीममध्ये संधी मिळालेली नाही. हे सगळे खेळाडू भारताच्या आशिया कपच्या टीममध्ये होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या २ वनडेसाठी भारतानं १४ जणांच्या टीमची निवड केली आहे.

अशी आहे भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायुडू, मनिष पांडे, एमएस धोनी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दुल ठाकूर,