मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच निवडण्यासाठी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात मंथन सुरू आहे. यात काल पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या पाच उमेदवारांना दोन बेसीक प्रश्न विचारण्यात आले. ते बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उघड केले आहेत.
काल बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीची एक तास बैठक होऊनही नव्या कोच संदर्भात निर्णय झाला नाही. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण असलेल्या सल्लागार समितीने पाच जणांच्या मुलाखती घेतल्या यात रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला.
यावेळी सीएसीच्या सदस्यांनी उमेदवारांना विचारलेल्या प्रश्नांपैकी दोन प्रश्न बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेसमोर उघड केले. या पहिला प्रश्न इंग्लडमध्ये २०१९ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी व्हिजन काय आणि दुसरा प्रश्न कर्णधाराशी तुलना करता कोचची भूमिका काय असेल असा होता. काही नाजुक स्थिती निर्माण झाली तर तुम्ही कशी सांभाळाल असेही यात विचारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाच उमेदवारांना अनेक वेगवेगळ्या प्रश्नांनी भडावून सोडले होते. विविध परिस्थितीत कसे वागाल असे विचारण्यात आले. यावेळी प्रत्येकाला भारतीय संघाचा कोच व्हायचा आहे. हे त्यांच्या प्रेझंटेशनने दिसत होते. रिचर्ड पायबस, टॉम मुडी आणि रवी शास्त्री यांचे प्रेझंटेशन खूप चांगले होते. असे बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले.