रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे मध्ये भारताचा ३२ रन्सने पराभव झाला. कोहलीने शतकी खेळी करुन भारताला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण इतर खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे कोहलीचे शतक व्यर्थ गेले. तिसऱ्या मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
या पराभवामुळे कोहली नाराज झालेला पाहायला मिळाला. 'जेव्हा मी आऊट झालो, तेव्हा विजयासाठी हव्या असलेल्या रन्स आणि बॉलमध्ये केवळ २० रन्सचे अंतर होते. आम्ही आधीपासूनच आव्हानाचं पाठलाग करायला लागेल, या मानसिकतेत होतो. ऑस्ट्रेलिया विजयासाठी जवळपास ३५० रन्सचे आव्हान देणार असे वाटत होते. पण ग्लेन मॅक्सवेल याला रनआऊट केल्याने आम्ही परत एकदा मॅचमध्ये परतलो. या मैदानात संध्याकाळ नंतर दव पडण्यास सुरुवात होते. असे आम्हाला सांगण्यात आले होते. पण असे काही झाले नाही. त्यांचा अंदाज चुकीचा निघाला.' असे कोहली म्हणाला.
भारतीय टीमचा तिसऱ्या मॅचमध्ये काही चुकांमुळे पराभव झाला. या मुद्द्यांवर कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे. 'रांचीची खेळपट्टी ही खेळण्यासाठी कठीण होती. त्यामुळे बॅटिंग दरम्यान धीम्या बॉलवर फटका मारण्यासाठी देखील जोखीम पत्कारावी लागत होती. भारताने आपल्या पहिल्या तीन विकेट अवघ्या २३ रन्सवर गमावल्या. त्यामुळे आक्रमकपणे खेळण्याचा पर्याय नव्हता. जसं जसं भारताच्या विकेट जात होत्या, त्यासोबतच विजयासाठीचे आव्हान कठीण होत जात होते. विजय शंकर आणि मी आऊट झाल्यानंतर भारताजवळ कोणताच पर्याय नव्हता.' असे कोहली म्हणाला.
विजयी लक्षाचे पाठलाग करताना आपले नियमित अंतराने विकेट गमावावेत असे कोणत्याच टीमला वाटत नाही. भारताने दोन विकेट गमावल्यानंतर भारताची परिस्थिती वाईट सुरुवात झाली. पण यानंतर भारताने तिसरा विकेट देखील गमावला. यामुळे भारताची परिस्थिती नाजूक झाली होती.
भारताचे ओपनर आणि मधल्या फळीतील खेळाडूंनी निराशाजनक खेळी केली. त्यामुळे आपल्या कामगिरीत बदल करण्यासाठी प्रयत्न करतील असे म्हणत विराटने आपल्या खेळाडूंवर विश्वास दर्शवला आहे.
मी माझ्या नैसर्गिक पद्धतीने खेळलो. शतकी खेळी केली. पण जेव्हा भारताला खरी गरज होती, तेव्हा मी आऊट झालो. यामुळे मी स्वत:वर नाराज आहे. जेव्हा मी आऊट झालो, तेव्हा विजयासाठी आवश्यक असलेल्या रन्समध्ये आणि शिल्लक बॉलमध्ये अवघ्या २० रन्सचे अंतर होते. असे देखील कोहली म्हणाला.
यावेळी कोहलीने उर्वरित दोन वनडेसाठी टीममध्ये काही बदल करण्याबदद्ल सूचक वक्तव्य केले. वर्ल्ड कपच्या दृष्टीने खेळाडूंना टीममध्ये संधी देण्यात येणार आहे. असे कोहली म्हणाला.
आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारतीय टीममध्ये नवनवीन प्रयोग केले जात आहेत. टीममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन मॅचसाठी बदल केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या खेळाडूंना टीममध्ये संधी देण्यात येईल. त्या खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात येईल. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे.