INDvsSA: तिसरी टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली तिसरी टेस्टमध्ये रंगतदार अवस्थेत आली स्थितीत पोहोचली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 26, 2018, 08:07 PM IST
INDvsSA: तिसरी टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत  title=

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली तिसरी टेस्टमध्ये रंगतदार अवस्थेत आली स्थितीत पोहोचली आहे.

मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने उभ्या केलेल्या स्कोअरमुळे विजयाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समनने चांगली खेळी खेळली. 

हे पण पाहा: INDvsSA: विराट कोहलीने धोनी-गावस्करचा 'हा' रेकॉर्ड मोडला

टीम इंडियाची इनिंग २४७ रन्सवर आटोपली आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेच्या टीमसमोर विजयासाठी २४१ रन्सचं आव्हान आहे.

तिसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियातील विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वरने झुंजार खेळी खेळली.

विराट कोहलीने ४१ रन्स केले, रहाणेने ४८ रन्स तर भुवनेश्वर कुमारने ३३ रन्सची इनिंग खेळली. त्यामुळे टीम इंडियाला चांगला स्कोअर करण्यात यश आलं.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून वर्नेन फिलँडर, रबाडा आणि मॉर्केल यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतले.