केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी आफ्रिकन टीमने केलेल्या बॉलिंगमुळे त्यांना मॅचमध्ये कमबॅक करणं शक्य झालं आहे.
दुसऱ्या दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या टीमने २ विकेट्स गमावत ६५ रन्स केले असून १४२ रन्सची आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाच्या बॅट्समन मैदानात उतरले मात्र, त्यांना एकामागेएक असे माघारी धाडण्यात आले. केवळ हार्दिक पांड्याने एक बाजू सांभाळली आणि टीमला काही प्रमाणात सांभाळलं.
हार्दिक पांड्याने केलेल्या ९३ रन्सच्या खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये २०९ रन्स करता आले. मात्र, तरीही दक्षिण आफ्रिकन टीमने केलेल्या स्कोअरपेक्षा टीम इंडिया ७७ रन्सने पिछाडीवर होती.
टीम इंडिया ऑल आऊट झाल्यानंतर आफ्रिकन बॅट्समन मैदानात उतरले. यावेळीही हार्दिक पांड्याने ४ ओव्हरमध्ये १७ रन्स देत २ विकेट्स घेतले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी आफ्रिकन टीमचा स्कोअर २ विकेट्स गमावत ६५ रन्स होता आणि त्यांनी १४२ रन्सची आघाडी घेतली आहे.