Deepak Hooda वर अन्याय? केवळ प्रतिष्ठेच्या जोरावर Virat Kohli ला खेळवण्याचा काय उपयोग?

दुसऱ्या सामन्यात कोहलीला केवळ त्याच्या नावाच्या आधारे टीममध्ये स्थान देण्यात आलं.

Updated: Jul 10, 2022, 02:05 PM IST
Deepak Hooda वर अन्याय? केवळ प्रतिष्ठेच्या जोरावर Virat Kohli ला खेळवण्याचा काय उपयोग? title=

मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. मात्र पहिल्या सामना जिंकूनंही चांगल्या फॉर्मात असलेल्या दीपक हुडाला संघातून वगळण्यात आलं. पहिल्या सामन्यात दीपकने चांगली फलंदाजी करत होता आणि कोहलीच्या कारणास्तव त्याला टीममधून वगळण्यात आलं. 

दरम्यान दुसऱ्या सामन्यात कोहलीला केवळ त्याच्या नावाच्या आधारे टीममध्ये स्थान देण्यात आलं. इतकंच नाही टीम मॅनेजमेंटला कोहलीचा सध्याचा खराब फॉर्म ठाऊक असूनही त्यांना हा निर्णय घेतला. यावरून आता अनेकांनी टीका केली आहे.

दीपक हुडा याच्यावर अन्याय झाला?

आयर्लंडविरुद्ध नाबाद 47 आणि 104 धावांची खेळी करणाऱ्या दीपक हुडाने इंग्लंडविरुद्धच्या आधीच्या सामन्यात 17 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या सामन्यात कोहलीला खेळवल्यामुळे त्याला वगळण्यात आलं होतं. फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला वगळण्याचा टीम मॅनेजमेंटचा निर्णय निश्चितच खूप वाईट आणि कठीण निर्णय होता.

याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने आणखी तीन बदल केले आहेत. अर्शदीप सिंगची निवड फक्त एका T20 साठी झाली होती, त्यामुळे जसप्रीत बुमराहची जागा आधीच निश्चित झाली होती. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजा आणि इशान किशनच्या जागी ऋषभ पंतची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली होती. 

कोहलीची खराब कामगिरी सुरूच आहे

फेब्रुवारीनंतर पहिला टी-20 सामना खेळणाऱ्या विराटने 3 बॉलमध्ये एक रन केला. भारताचा माजी कर्णधार गेल्या काही वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या खराब कामगिरीनंतर तो फक्त दोन T20 खेळला आहे. यादरम्यान कोहलीने फक्त आयपीएलमध्ये टी-20 क्रिकेट खेळले पण त्यातही चांगली कामगिरी करता आली नाही.