Pakistan Team, World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट संघाला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मोठी कामगिरी करता आली नाही. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या विजयाची गाडी रुळावरून खाली उतरवली. त्यानंतर पाकिस्तानला (Pakistan Cricket team) कमबॅक करता आलं नाही. पाकिस्तानचा संघ मागील चारही सामन्यात फेल ठरला. त्यामुळे आता पाकिस्तान वर्ल्ड कपमधून जवळजवळ बाहेर गेला आहे. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पीसीबीचे (PCB) मुख्य निवडकर्ते इंझमाम उल हक (Inzamam-ul-Haq) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Pakistan Cricket Board (PCB) has set up a five-member fact-finding committee to investigate allegations in respect of conflict of interest reported in the media pertaining to the team selection process.
The committee will submit its report and any recommendations to the PCB…
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 30, 2023
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं आतापर्यंत 6 सामने खेळले असून, सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला होता. तर, त्यानंतरचे 4 सामने मात्र पराभव पाहावा लागला. त्यामुळं पॉईंट्सटेबलमध्ये संघ समाधानकारक स्थानावर नाही हे नक्की. सध्या संघाच्या खात्यात 4 गुण आहेत, तर -0.387 नेट रन रेटच्या बळावर संघाला सहावं स्थान मिळालं आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. शोएब अख्तर, वसिम अक्रम आणि इतर माजी खेळाडूंनी देखील टीम सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
हारून रशीद यांनी पद सोडल्यानंतर 53 वर्षीय इंझमाम-उल-हक या वर्षी ऑगस्ट महिन्यात पीसीबीचे मुख्य निवडकर्ता बनले होते. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम तीन महिन्यांहून कमी काळ पदावर राहिले आहेत. पीसीबीने 5 सदस्यीय तथ्य शोध समिती स्थापन केली होती.
गेल्या पाच महिन्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंना पगार मिळालेला नाही. खेळाडू तुमचं ऐकतील का? बाबर आझम पीसीबी चेअरमनला मेसेज करतोय मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला जात नाहीये, असा आरोप पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफने एका लाईव्ह कार्यक्रमात केला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं.