मुंबई : आयपीएल २०१८ सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत. मात्र, त्यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीमला एक मोठा झटका बसला आहे. दिल्ली डेअरडेविल्सच्या टीममधील एक फास्ट बॉलर आयपीएलमधून बाहेर गेलाय.
जबरदस्त फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलर कागिसो रबाडा याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने खरेदी केलं होतं. मात्र, दिल्लीचा हा फास्ट बॉलर कागिसो रबाडा हा दुखापतग्रस्त झाला आहे त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर गेला आहे.
दिल्लीच्या टीममधील रबाडा ऑस्ट्रेलिया विरोधात सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट मॅच दरम्यान दुखापतग्रस्त झाला. पाठिच्या दुखापतीमुळे राबाडाला आयपीएलमध्ये खेळणं शक्य होणार नाहीये.
रबाडाच्या या दुखापतीवर दक्षिण आफ्रिकेचे टीम मॅनेजर मोहम्मद मूसाजी यांनी म्हटलं की, "रबाडाला पाठदुखीचा त्रास होत आहे त्यामुळे पुढील तीन महिने तो क्रिकेट खेळू शकत नाही.
आयपीएलमधून बाहेर होणारा रबाडा हा पहिला बॉलर नाहीये. याआधी ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क हा सुद्धा दुखापतीमुळे केकेआरच्या टीमकडून खेळू शकणार नाहीये.
आयपीएल २०१८ चा सीजन ७ एप्रिलपासून सुरु होत असून पहिली मॅच दिल्ली डेअर डेअरडेविल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात होणार आहे.