नवी दिल्ली : 'आयपीएल सीझन ११' च्या टीम आणि त्यांच्या खेळाडूंची सगळीकडे चर्चा आहे. कोणत्या टीममध्ये कोणते प्लेयर्स खेळणार हे जरी ठरले असले तरीही त्यांचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टनची नावे हळूहळू समोर येत आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाब' टीमचा कॅप्टन कोण असणार याचीही बरीच चर्चा रंगली होती. अखेर त्याचे उत्तर मिळालेय.
'किंग्ज इलेव्हन पंजाब'संघाचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवागने फेसबुक लाईव्ह दरम्यान यासंदर्भात माहिती दिली.
यावेळी आर. आश्विनच्या नावाची कॅप्टन म्हणून घोषणा करण्यात आली. ३१ वर्षीय आश्विनला पंजाबच्या फ्रेंचाइजीने ७.६ कोटी रुपयांना खरेदी केलं.
आर.आश्विन हा २०१५ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा हिस्सा होता.त्यानंतर २ वर्षे तो पुणे सुपर जाएंट्ससाठी खेळला. २०१७ मध्ये दुखापतीमुळे तो आयपीएल खेळू शकला नाही.
२ वर्षाच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये परतणाऱ्या चेन्नई टीमने त्याला पुन्हा आपल्या संघात घेतले नाही.
आश्विनने २००९ ते २०१७ पर्यंत १११ मॅच खेळला. ज्यामध्ये ६.५५ इकॉनॉमी रेट आणि २५.०० च्या सरासरीने बॉलिंग केली.
आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १०० विकेट घेतल्या आहेत. ३४ वर ४ विकेट हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.