मोहाली : बंगळुरुने पंजाबचा ८ विकेटने पराभव केला आहे. पंजाबने बंगळुरुला विजयासाठी १७४ रनचे आव्हान दिले होते. ते आव्हान बंगळुरुने ४ बॉल शेष ठेवून आणि २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले आहे. या विजयासोबतच बंगळुरुने यंदाच्या पर्वातील पहिली मॅच जिंकली आहे. बंगळुरुकडून सर्वाधिक ६७ रन कॅप्टन विराट कोहलीने केले. तर एबी डीव्हीलियर्सने नॉटआऊट ५९ रनची महत्वपूर्ण खेळी केली. एबी डीला मार्कस स्टोनिसने चांगली साथ दिली. स्टोनिसने २८ रनची उपयुक्त खेळी केली. बंगळुरुचे दोन विकेट मोहम्मद शमी आणि आर आश्विन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Yeah, yeah. We've finally opened our account. #playBold #KXIPvRCB #VIVOIPL2019
— Royal Challengers (@RCBTweets) April 13, 2019
A victory at Mohali as @RCBTweets register their first win of the #VIVOIPL 2019 season pic.twitter.com/yESiuz1KAl
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2019
पंजाबने विजयासाठी दिेलेल्या 174 रनच्या लक्ष्याचे पाठलाग करायला आलेल्या बंगळुरुने फटकेबाजीने सुरुवात केली. पार्थिव पटेल आणि विराट कोहली ही जोडी सलामीला आली. या दोघांमध्ये पहिल्या विकटेसाठी 43 रन जोडले. पार्थिव पटेल चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 19 रनवर असताना कॅचआऊट झाला. त्याला आश्विनने आऊट केले. यांनतर आलेल्या एबी डी वीलीयर्सच्या सोबतीने कॅप्टन कोहलीने टीमला स्थिरावलं. कोहली-डीव्हीलीयर्स मध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी पार्टनरशीप झाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 रन जोडले. या दरम्यान विराट कोहलीने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. कोहलीला अर्धशतक केल्यानंतर जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याने 53 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली. बंगळुरुचा स्कोअर 128 असताना विराट कोहली आऊट झाला. कोहलीची विकेट मोहम्मद शमीने घेतली.कोहली कॅचआऊट झाला.
याआधी बंगळुरुने टॉस जिंकत पंजाबला बॅटिंग करण्यास आमंत्रित केले. बॅटिंगसाठी आलेल्या पंजाबने स्फोटक सुरुवात केली. ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीने पंजाबला चांगली आणि वेगवान सुरुवात मिळवून दिली. या दोघांमध्ये 66 रनची पार्टनरशीप झाली. पंजाबने पहिला विकेट लोकेश राहुलच्या रुपात गमावला. राहुल 18 रन करुन आऊट झाला. यानंतर गेल ज्यासाठी ओळखला जातो तो त्याच्या तडाखेदार खेळीसाठी.
अशीच तडाखेदार खेळी आज सर्व क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाली. गेलने नॉटआऊट 64 बॉलमध्ये 99 रन केल्या. या खेळीत त्याने 5 सिक्स आणि 10 फोर लगावले. गेलच्या 99 रनच्या जोरावर पंजाबने 4 विकेट गमावून 173 रन केल्या. बंगळुरु कडून युझवेंद्र चहलने 2 तर मोहम्मद सिराज आणि मोईन अलीने 1-1 विकेट घेतली.