IPL 2019: चेन्नईला आणखी एक झटका, दुसरा दिग्गज खेळाडू बाहेर

शानदार फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे.

Updated: Apr 14, 2019, 04:44 PM IST
IPL 2019: चेन्नईला आणखी एक झटका, दुसरा दिग्गज खेळाडू बाहेर title=

कोलकाता : शानदार फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये दुखापतीमुळे हरभजन खेळू शकत नाहीये. या मोसमात हरभजन सिंगने ४ मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये दोन 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार आहेत. हरभजन सिंगच्या मानेला दुखापत झाली आहे, तसंच हरभजनची पत्नी आणि मुलीची तब्येतही खराब आहे. या कारणामुळे हरभजन कोलकात्यालाही आला नाही.

'मला जयपूरमध्ये राजस्थानविरुद्धचा सामना खेळायचा होता. पण सकाळी अचानक माझी मान दुखायला लागली आणि मला ती मॅचदेखील खेळता आली नाही. माझी पत्नी आणि मुलीची तब्येतही ठीक नाही. यासाठी मी मुंबईमध्ये आहे. त्या ठीक झाल्यानंतर मी टीमसोबत असेन,' असं हरभजन म्हणाला.

ड्वॅन ब्राव्होला झालेल्या दुखापतीनंतर आता हरभजन नसणं हा चेन्नईसाठी दुसरा मोठा धक्का आहे. ड्वॅन ब्राव्होच्या मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचनंतर ब्राव्हो एकही मॅच खेळलेला नाही. 'ब्राव्हो नसल्यामुळे टीमचं संतुलन खराब होतं,' असं वक्तव्य धोनीने केलं आहे.

धोनीकडून हरभजनचं कौतुक

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने हरभजन सिंग आणि इम्रान ताहीर यांचं कौतुक केलं आहे. 'हरभजन ज्या मॅचमध्ये खेळला, त्या मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. इम्रान ताहिरनेही त्याची भूमिका चोख बजावली. मला त्याच्यावर भरवसा आहे. तो चांगला फ्लिपर टाकतो. ताहिरला तुम्ही ज्या गतीने बॉल टाकायला सांगाल, त्या गतीने तो बॉल टाकतो. हरभजन आणि इम्रान ताहिर हे जुन्या दारूसारखे आहेत', अशी प्रतिक्रिया धोनीने दिली.