IPL 2019 : प्लेऑफमधून बाहेर जाताच प्रितीची धोनीला धमकी, 'सांभाळून राहा नाहीतर....'

प्रिती झिंटा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील चर्चेने सर्वांचच लक्ष वेधलं 

Updated: May 8, 2019, 07:36 PM IST
IPL 2019 : प्लेऑफमधून बाहेर जाताच प्रितीची धोनीला धमकी, 'सांभाळून राहा नाहीतर....'
प्रिती झिंटा, महेंद्रसिंह धोनी

मुंबई : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेध सर्वांनाच लागलेले असताना आयपीएलची जादू काही केल्या कमी होण्याच नाव घेत नाही आहे. मुंबईच्या संघाने यंदाच्या आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तोच धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात येणाऱ्या चेन्नईच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. गुणांच्या आकडेवारीची ही गणितं सोडवली जात असतानाच अभिनेत्री प्रिती झिंटा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील चर्चेने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. ज्याविषयी सोशल मीडियावर खुद्द प्रितीनेच खुलासाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. 

अधिक वाचा : IPL Qualifier 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई, बॉल एक किस्से अनेक   

प्लेऑफसाठी पात्र न ठरलेल्या पंजाबच्या संघाची मालकीण, प्रिती झिंटा चेन्नईच्या संघासोबत झालेल्या त्यांच्या सामन्यात खेळाडूंशी संवाद साधताना दिसली होती. याचवेळी तिने चक्क कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला धमकीही दिली. धोनीला धमकी.....? पडाल ना तुम्हालाही प्रश्न? प्रितीने धोनीला एक धमकी दिली खरी. पण, तिची ही धमकी कोणत्याही गंभीर स्वरूपाची नाही हेसुद्धा तितकच खरं. 

मंगळवारी खुद्द प्रितीने माहीसोबतचं एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत त्यासोबत कॅप्शन लिहिलं आणि धोनीला एक धमकीही दिल्याचं सांगितलं. 'कॅप्टन कूलचे माझ्यासह असंख्य चाहते आहेत. पण, त्याच्याप्रती असणारी ही आत्मियतेची भावना आता त्याच्या मुलीच्या कलाने जाऊ लागली आहे' असं तिने ट्विटमध्ये लिहित धोनीला, सांभाळून राहा..... अशी इशारावजा धमकीच दिली आहे. 'मी तुझ्या मुलीचं अपहणही करु शकते', असंही तिने या ट्विटमध्ये लिहिलं आहे. प्रितीचं हे ट्विट पाहता झिवाप्रती असणारं प्रेम करण्याचा तिचा हा अंदाज धोनीच नव्हे, तर असंख्य चाहत्यांनाही भावला असणार यात शंका नाही. 

फक्त प्रिती झिंटाच नाही, तर चाहते, सेलिब्रिटीसुद्धा माही आणि साक्षीच्या लेकीचे चाहते झाले आहेत. प्रेक्षकांमध्ये बसून 'Come On Papa....!' असं ओरडत आपल्या बाबांना प्रोत्साहन देणं असूदे, त्यांच्यासोबत एखादी कविता म्हणणं असूदे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसोबत खेळणं असूदेत धोनीची लेक ही बहुविध मार्गांनी सर्वांचंच लक्ष वेधत आहे हे मात्र तितकच खरं.