close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आयपीएल २०१९ : पहिल्याच मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकला, दिल्लीची पहिले बॅटिंग

आयपीएलच्या १२व्या मोसमातला आपला पहिला सामना मुंबई खेळत आहे. 

Updated: Mar 24, 2019, 07:57 PM IST
आयपीएल २०१९ : पहिल्याच मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकला, दिल्लीची पहिले बॅटिंग

मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमातला आपला पहिला सामना मुंबई खेळत आहे. मुंबईचा हा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होत आहे. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबईला मागच्या मोसमात चांगली कामगिरी करता आली नव्हती. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला दिल्लीविरुद्धचा शेवटचा सामना जिंकणं गरजेचं होतं, पण दिल्लीने मुंबईचा पराभव केला आणि त्यांचं प्ले ऑफमध्ये जायचं स्वप्न भंगलं. आता या मोसमात मागच्यावर्षीचा पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल.

मुंबईने पहिल्या मॅचमध्ये युवराज सिंगला संधी दिली आहे. तर चार परदेशी खेळाडू म्हणून क्विंटन डीकॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग आणि मिचेल मॅकलेनघन यांची निवड केली आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, युवराज सिंग, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, रसीक सलाम, जसप्रीत बुमराह

दिल्लीची टीम 

शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत, कॉलीन इन्ग्राम, कीमो पॉल, अक्सर पटेल, राहुल टेवटिया, कागिसो रबाडा, ट्रेन्ट बोल्ट, इशांत शर्मा 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा