IPL 2020: एबी डिविलियर्सचा सिक्स, बॉल जेव्हा चालत्या कारवर आदळतो

डिव्हिलियर्सने शानदार नाबाद 73 धावांची खेळी

Updated: Oct 13, 2020, 08:56 AM IST
IPL 2020: एबी डिविलियर्सचा सिक्स, बॉल जेव्हा चालत्या कारवर आदळतो title=

शारजाह : आयपीएल 13 च्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा आरसीबीने 82 धावांनी पराभव केला. आरसीबीसाठी एबी डिव्हिलियर्स विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात डिव्हिलियर्सने शानदार बॅटींग केली. त्याने नाबाद 73 धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान एबीडीने शारजाह मैदानावर चौकार आणि षटकार ठोकले. एबी डिव्हिलियर्सने सिक्स मारल्य़ानंतर बॉल मैदानाबाहेर गेला आणि रस्त्यावरुन जात असलेल्या कारला जावून आदळला.

महत्त्वाचे म्हणजे एबी डिव्हिलियर्सने केकेआरविरुद्ध खेळत असताना आयपीएल कारकीर्दीतील 36 वे अर्धशतक पूर्ण केले. एबी डिव्हिलियर्सच्या फलंदाजीला आश्चर्यकारक सिक्स प्रेक्षकांनी अनुभवला. वेगवान गोलंदाज कमलेश नगरकोटी 16 वी ओव्हर टाकत होता. त्याच्या बॉलवर एबीने हा उंच सिक्स मारला.

डिव्हिलियर्सने मारलेला सिक्स इतका उंच गेला की, बॉल शारजाहच्या मैदानाबाहेर गेला. त्यानंतर बॉल रस्त्यावर चालणाऱ्या चालत्या कारला धडकला. एबीच्या या सिक्सची लांबी 86 मीटर होती. एबी डीच्या या चमकदार सिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शारजाहच्या मैदानावर एबी डिव्हिलियर्सने कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व गोलंदाजांच्या बॉलिंगवर फटकेबाजी केली. डिव्हिलियर्सने आपल्या प्रसिद्ध शैलीत नाबाद 73 धावा केला. आणि तेही केवळ 33 बॉलमध्ये. या दरम्यान एबी डिव्हिलियर्सने 5 चौकार आणि 6 मोठे सिक्स ठोकले.

एबीडीला त्याच्या या करिष्माई खेळीसाठी सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. एबी डिव्हिलियर्सचा हा अविस्मरणीय डाव कौतुकास्पद होता. एबीच्या या 73 धावांमुळे बंगळुरूचा संघ 20 ओव्हरमध्ये 194 धावा करु शकला.