IPL : आर्चर बनला 'सुपर मॅन'; एका हाताने पकडली कॅच Video

कॅचची जोरदार चर्चा 

Updated: Oct 25, 2020, 10:15 PM IST
IPL : आर्चर बनला 'सुपर मॅन'; एका हाताने पकडली कॅच Video

मुंबई : IPL 2020 च्या ४५ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स RR च्या जोफ्रा आर्चरने पकडललेल्या कॅचची जोरदार चर्चा रंगली आहे. या कॅचला बघून सगळेच हैराण झाले आहेत. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर ईशान किशनने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट लगावला. या दरम्यान बाऊंड्री जवळ असलेल्या जोफ्रा आर्चरने हवेत इंच उडी घेऊन एका हाताने कॅच पकडली. सध्या या कॅचची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

अबु धाबीत रविवारी मुंबई इंडियन्सच्या 11 व्या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूची अशी कच धरण्यात आली. स्ट्राइकवर ईशान किशन होता आणि कार्तिक त्यागी ओव्हरमधील चौथा चेंडू फेकत होता. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट चेंडू फेकला. किशनने बॅटच्या दिशेने येणाऱ्या चेंडूला हवेत थर्ड मॅनच्या बाजूने उडवलं. 

ही कॅच पकडल्यानंतर सगळ्यांनीच आश्चर्यव्यक्त केलं. सोशल मीडियावर याचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर होत आहे.