शारजाह : आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एकूण 33 सिक्स लागले. या सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानने विजय मिळवला. 2018 मध्ये चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात 33 सिक्स लागले होते.
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सिक्स मारण्यात राजस्थानचा संजू सॅमसन आघाडीवर होता. त्याने 9 सिक्स मारले. चेन्नईचा फाफ डु प्लेसिसने 7 सिक्स मारले. राजस्थानच्या स्टीव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी 4 सिक्स मारले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 3 सिक्स ठोकले तर त्याच्याच संघाचा सॅम कुरेनने 2 सिक्स मारले.
सॅमसनने 32 चेंडूंत 74 धावा केला. स्मिथने 47 चेंडूत 69 धावा केल्या. आर्चरने 8 चेंडूत 27 धावा केल्या. या सर्वांमुळे राजस्थानने 7 विकेट्समध्ये 216 धावा केल्या. चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 200 धावाच करता आल्या. फाफ डु प्लेसिसने 37 बॉलमध्ये 72 रन केले.