IPL मध्ये वाढणार चुरस, या 2 नव्या संघांना मिळालं स्थान

8 नाही तर 10 संघांमध्ये रंगणार सामने, 2 नव्या टीमची घोषणा कधी होणार जाणून घ्या

Updated: Mar 14, 2021, 10:34 AM IST
IPL मध्ये वाढणार चुरस, या 2 नव्या संघांना मिळालं स्थान title=

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14 वे सत्र 9 एप्रिलपासून होणार आहे. 6 शहरांमध्ये आयपीएलचे सामने रंगणार आहे. यंदाच्या IPLमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.  BCCI कडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलच्या मैदानात 8 ऐवजी आता 10 संघ मैदानात उतरणार आहेत. आता वाढलेले आणखीन दोन संघ कोणते आणि यंदाच्या आयपीएलमध्ये ते खेळणार का असे अनेक प्रश्न पडले असतील. 

2022मध्ये होणाऱ्या IPL सामन्यासाठी एकूण 15 पैकी 10 संघ मैदानात आमने-सामने खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. या संघांची घोषणा 2021च्या अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. 

बीसीसीआयने ठरवले आहे की ते आता आयपीएलमध्ये 10 नव्हे तर 10 संघ मैदानात उतरतील. 2022 मध्ये होणार्‍या आयपीएल 15 मध्ये 10 संघ भाग घेतील. २०२१ च्या हंगामाच्या शेवटी या संघांचा लिलाव होईल. वर्षाच्या सुरूवातीला आयपीएलच्या संचालक समितीने मंजूर केलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांवर विचार करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी बैठक घेतली. गांगुली यांनी यापूर्वीही अनेक वेळा आयपीएलमध्ये आणखी दोन संघ वाढविण्याचे संकेत दिले होते. मात्र या टीम कोणत्या आणि त्यामध्ये कोण असेल याबाबत सध्या गोपनीयता राखण्यात आली आहे. 

IPL 2022 मध्ये 8 ऐवजी 10 संघ  मैदानात खेळताना दिसणार आहेत. या संघांचा लिलाव यावर्षी मे महिन्यात आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात होईल. गोपनीयतेच्या अटीवर बीसीसीआयच्या एका अधिका-याने पीटीआय याबाबत माहिती दिली “पुढच्या वर्षापासून आयपीएलमध्ये 10 संघ असतील आणि या वर्षाच्या मे महिन्यापर्यंत नवीन फ्रँचायझीची बोली प्रक्रिया आणि त्यासंबंधित गोष्टी करण्यात येतील. संघांचा निर्णय घेतल्यानंतर ते आपले कामकाज सुरू करू शकतात, यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2022मध्ये दोन नवीन संघांचा समावेश मैदानात प्रत्यक्षात करण्यात येणार आहे.

यंदाच्या IPL सामन्यात मात्र 8 संघच खेळणार आहेत. 9 एप्रिलपासून 31 मेपर्यंत 6 शहरांमध्ये IPL खेळवण्यात येणार आहे. कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.