ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडनं सांगितलं सिक्रेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

IPLमध्ये पंतच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. 

Updated: May 7, 2021, 03:39 PM IST
ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडनं सांगितलं सिक्रेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... title=

मुंबई: कोरोनामुळे IPL तात्पुरती स्थगित झाली आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची कमान ऋषभ पंतच्या खांद्यावर आली. युवा कर्णधार असलेल्या पंतने ही कमान योग्य पद्धतीनं सांभाळत आपल्या संघाता पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आणलं. पंतची जसी मैदानातील कामगिरीवर चर्चा आहेत तेवढीच त्याच्या गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपले वेगवेगळे फोटो-व्हिडीओ सतत अपलोड करून ती काय करते आहे हे चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. आता एका व्हिडीओमधून तिने खास सिक्रेट सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता ईशा विचारते तुम्हाला एक सिक्रेट जाणून घ्यायचं आहे. आय लव्ह यू असं म्हणते आणि व्हिडीओ संपतो. या व्हिडीओवर चाहत्यांनी तिला ऋषभ पंतला बोल असं म्हटलं आहे. इतकच नाही तर काही युझर्सनी तर पंतवरून कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Isha Negi (@ishanegi_)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

ऋषभ पंतने 16 जानेवारी 2019मध्ये इन्स्टावर ईशासोबतचा फोटो शेअर करून कॅप्शन देत आपलं तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगितलं होतं. ईशाने देखील तोच फोटो शेअरकरत प्रेम-आयुष्य- सोलमेट असं कॅप्शन दिलं होतं. या दोघांनी आपल्या रिलेशनबद्दल सोशल मीडियावर ही रोमँटिक पोस्ट केली होती.

IPLमध्ये पंतच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई आणि दिल्ली संघामध्ये केवळ 2 पॉइंटचा फरक आहे. 8 सामन्यांपैकी पंतच्या टीमने 6 सामने जिंकले आहेत.