मुंबई: वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात गब्बरने दिल्लीच्या संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. पृथ्वी शॉ आणि गब्बर शिखर धवननं केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे दिल्ली संघाला पंजाबवर दणदणीत विजय मिळवता आला. 6 विकेट्स राखून दिल्ली संघाने पंजाबवर विजय मिळवला.
दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाब संघाला पहिली फलंदाजी करावी लागली. पंजाब संघात के एल राहुलने 61 तर मयंग अग्रवालने 67 धावांची खेळी केली. त्यानंतर दीपक हुड्डाने 22, शाहरुख खानने 15 धावा केल्या. त्यांनी पंजाब संघासमोर 196 धावांचं लक्ष्य ठेवलं.
दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि धवननं प्ले ऑफमध्ये चांगल्या धावा केल्या. पृथ्वी 32 धावा करून तंबुत परतला तर गब्बरनं खिंड लढवली आणि सामन्यावर पकड मजबूत केली.
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 18, 2021
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 18, 2021
शिखर धवनचं शतक थोडक्यात हुकलं. मात्र 92 धावा केल्यानं त्याचा दिल्लीला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. दिल्ली संघाने दुसरा विजय मिळवत पॉइंट टेबलवर मुंबई संघाला मागे टाकत दुसरा क्रमांक गाठला आहे.
शिखर धवननं राॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील ग्लॅन मॅक्सवेलला या दमदार फलंदाजाला मागे टाकत ऑरेज कॅप मिळवली आहे. शिखर धवननं केलेल्या कामगिरीमुळे त्याचं कौतुक होत आहेच पण 8 धावांमुळे शतक हुकल्यानं काहीशी नाराजी देखील पाहायला मिळाली. दिल्ली संघ राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दणदणीत कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे.