DC vs RCB : शेवटच्या 3 बॉलमध्ये स्टार खेळाडूनं काय सांगितलं? के एस भरतनं सांगितलं सिक्रेट

के एस भरतच्या यशामागे विराट नाही तर या स्टार खेळाडूचा हात, सांगितलं सिक्रेट

Updated: Oct 9, 2021, 05:36 PM IST
 DC vs RCB : शेवटच्या 3 बॉलमध्ये स्टार खेळाडूनं काय सांगितलं? के एस भरतनं सांगितलं सिक्रेट title=

मुंबई: IPL 2021 च्या 14 व्या हंगामात RCB संघाने 7 विकेट्सने दिल्लीवर विजय मिळवला आहे. यासह बंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. बंगळुरू विरुद्ध दिल्ली सामन्यातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ग्लॅन मॅक्सवेल टीममधील खेळाडूला काहीतरी सांगत आहे. हे धडे देत असल्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

RCBचा नवा स्टार खेळाडू के एस भरत म्हणाला की, टीममधील स्टार खेळाडू ग्लॅन मॅक्सवेलला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात मी उत्तम शॉट्स खेळू शकतो याचा भरवसा मॅक्सवेलला आहे. शेवटच्या तीन चेंडूआधी मॅक्सवेलनं माझ्यावर विश्वास दाखवला. हाच विश्वास मी षटकार ठोकून सर्थ ठरवला. 

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भरतने 52 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या. अवेश खानच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भरतने आपल्या संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
 या निकालाचा गुणांकावर परिणाम झाला नाही आणि दिल्ली 20 गुणांसह अव्वल स्थानावर राहिली. 

आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाने 18 गुणांची भागीदारी केली. चांगल्या रन रेटमुळे चेन्नईने दुसरे स्थान मिळवले. शेवटच्या षटकापूर्वी भरत आणि मॅक्सवेल यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याचं गुपित सांगितलं आहे. भरत म्हणाला की मॅक्सवेलने माझा आत्मविश्वास वाढवला मी करू शकतो याचा माझ्या मनात विश्वास निर्माण केला त्यामुळे मला शेवटचे तीन चेंडू अधिक चांगले खेळता आले.