IPL 2021 KKR vs SRH: अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर नितीश राणानं मैदानात का दाखवली रिंग?

कोलकाता संघानं हैदराबादवर विजय मिळवला. या विजयात नितीश राणाचा मोठा वाटा आहे. त्याने आपलं अर्धशतक सर्वात जवळच्या व्यक्तीला समर्पित केलं, ही खास व्यक्ती कोण आहे जाणून घ्या

Updated: Apr 12, 2021, 07:57 AM IST
IPL 2021 KKR vs SRH: अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर नितीश राणानं मैदानात का दाखवली रिंग?

मुंबई: हैदराबाद विरुद्ध 10 धावांनी कोलकाता जिंकलं. या विजयात राहुल त्रिपाठी आणि नितीश राणाचा मोठा वाटा आहे. सामन्यात नितीशने 9 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहेत. त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे संघाला 187 धावा करता आल्या. त्रिपाठी आणि राणाच्या जोडीनं मैदानात तुफान आणलं तर हैदराबादसमोर मोठ्या धावांचं लक्ष्य ठेवता आलं. 

आपलं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर नितीश राणाने आनंद साजरा केला. अर्धशतक पूर्ण होताच राणाने मैदानात बोटातील अंगठी दाखवली. त्याने यावेळी केलेलं अर्धशतक आपल्या पत्नीला समर्पित केल्याचं सांगितलं जात आहे. त्याने 37 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानंतर स्पिनर मोहम्मद नबीचे टाकलेल्या चेंडूवर तो कॅच आऊट झाला. 

हैदराबादला पुन्हा एकदा पराभूत करण्यात कोलकाता संघाला यश आलं आहे. मागच्या हंगामात 2 सामन्यांमध्ये हैदराबादचा पराभव करण्यात आला होता. राहुल त्रिपाठी आणि राणा या दोघांनी मिळून 93 धावांची खेळी केली. ज्यामुळे संघाला एवढी धावसंख्या उभी करणं शक्य झालं.

मागच्या IPLच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात नितीश राणाने अर्धशतक केलं होतं. त्यावेळी त्याने दमदार फलंदाजी करत 53 चेंडूमध्ये 81 धावा केल्या होत्या. अर्धशतक पूर्ण झाल्याच्या आनंदात त्याने मैदानात सामन्यादरम्यान सुरिंदर नाव असलेला शर्ट दाखवला होता. नितीशनं हे अर्धशतक त्याचे सासरे सुरिंदर यांना मागच्या हंगामात समर्पित केलं होतं.  

नितीशच्या सासऱ्यांना कॅन्सर झाला होता. मरणाशी झुंज देत असतानाच नितीश IPLच्या सामन्यांमध्ये होता. त्यामुळे त्यांना शेवटचं भेटता देखील आलं नाही. 23 ऑक्टोबर 2020 मध्ये सुरिंदर यांचं निधन झालं होतं.