जितबो रे! कोलकाताचा बंगळुरुवर 9 विकेट्सने शानदार विजय

 कोलकाताने (Kolkata) या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.    

Updated: Sep 20, 2021, 10:51 PM IST
जितबो रे! कोलकाताचा बंगळुरुवर 9 विकेट्सने शानदार विजय  title=

मुंबई : कोलकाताने (KKR) आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याची विजयी सुरुवात केली आहे. कोलकाताने बंगळुरुवर (RCB) 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 93 धावांचे माफक आव्हान दिले होते. कोलकाताने हे विजयी आव्हान 10 ओव्हरआधी 1 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कोलकाताने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 94 धावा केल्या. (ipl 2021 match 31 kkr vs rcb kolkata knight riders beat royal challengers banglore by 9 wickets at sheikh zayed stadium)

कोलकाताकडून  सलामीवीर शुबमन गिलने 34 चेंडूत 6 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने शुबमनला चांगली साथ दिली. अय्यरने 27 बॉलमध्ये  7 फोर आणि 1 सिक्ससह 41 धावांची तुफानी खेळी केली.  बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने एकमेव विकेट घेतली.  कोलकाताने 10 ओव्हर ठेवून सामना जिंकला. या मोठ्या अंतराने सामना जिंकल्याने कोलकताला याचा फायदा नेट रन रेटमध्ये होईल. 

बंगळुरुची बॅटिंग

याआधी बंगळुरुने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र बंगळुरुची निराशाजनक सुरुवात झाली. कर्णधार कोहलीच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का बसला. विराटचा हा 200 वा सामना होता. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या आणि चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटने 5 धावा करुन मैदानाबाहेरची वाट धरली. 

यानंतर देवदत्त पडीक्कल आणि श्रिकर भरतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  या दोघांनी दुसऱ्या विकेट्साठी 31 धावा जोडल्या. पार्टनरशीपने जम बसवला होता. मात्र लॉकी फर्ग्युसनने ही भागीदारी मोडली. लॉकीने देवदत्तला 22 धावांवर बाद केलं. 

यानंतर बंगळुरुच्या फलंदाजांनी कोलतकाच्या बोलर्ससमोर पाचारण केलं. एकमागोमाग एक विकेट गेले. मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्थीने बंगळुरुच्या फलंदाजांना घाम फोडला. वरुणने आपल्या फिरकीच्या तालावर बंगळुरुच्या बॅट्समनना नाचवलं. तर दुसऱ्या बाजूला आंद्रे रसेलनेही वरुणला चांगली साथ दिली. 

वरुणने 13 धावांच्या मोबदल्यात 4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तर आंद्रे रसेलने 3 ओव्हरमध्ये 9 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडलं. लॉकीने 2 विकेट घेत चांगली साथ दिली.  तर प्रसिद्ध क्रिष्णानेही 1 विकेट मिळवली. 

पॉइंट्सटेबलमध्ये कोण कुठे? 

या विजयामुळे कोलकाताने पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर  बंगळुरु 10 पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. या पराभवामुळे बंगळुरुला प्लेऑफसाठीचा मार्ग खडतर झाला आहे. गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स 12 गुणांसह अव्वलस्थानी आहे.  

पुढचा सामना कधी? 

दरम्यान मोसमातील पुढचा सामना (IPL 2021 32nd Match) हा उद्या (21 सप्टेंबर) दुबईत खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब विरुद्ध राजस्थान आमनेसामने असणार आहे.