IPL 2021 MI vs DC: हिटमॅननं सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या दिल्लीच्या बॉलरला दिलं गिफ्ट

मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे हिरमोड झालेल्या चाहत्यांची मनं हिटमॅन कोहलीनं जिंकली, जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलरला दिलं गिफ्ट

Updated: Apr 21, 2021, 03:36 PM IST
IPL 2021 MI vs DC: हिटमॅननं सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या दिल्लीच्या बॉलरला दिलं गिफ्ट title=

मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने ऋषभ पंतचा संघ जिंकला आहे. मोठ्या पराभवानंतरही कर्णधार रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्स संघातील त्याचा फॅन असलेल्या बॉलरला सामन्यानंतर एक खास गिफ्ट दिलं आहे. 

मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झाल्यामुळे चाहत्यांचा जरी हिरमोड झाला असला तरी कर्णधार रोहित शर्माचा फॅन असलेल्या बॉलरला दिलेल्या गिफ्टमुळे सर्वांची मनं जिंकली आहे. या दोघांचे फोटो दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या ट्वीटरवर शेअर केले आहेत. 

दिल्ली कॅपिटल्स संघातील फॅन आणि  बॉलर आवेश खानच्या जर्सीवर रोहित शर्मानं आपला ऑटोग्राफ दिला आहे. आवेशने आपली जर्सी रोहितसमोर करताच त्याने सही करून ती आवेशला दिली. हे सुंदर गिफ्ट मैदानात मिळाल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता. 

बॉलर आवेश खाननं दोन तर अमित मिश्राने 4 विकेटस घेतल्या. बॅटिंगमध्ये स्टिव स्मिथ आणि शिखर धवनने कमाल केली. शिखरनं 45 तर स्टिवने 33 धावांची खेळी केली. पॉईंट टेबलमध्ये दिल्ली संघ दुसऱ्या स्थानावर आहे. 
 25 एप्रिल रोजी दिल्ली संघाचा सामना हैदराबादसोबत होणार आहे.