IPL 2021 MI vs RCB: यॉर्कर खेळताना बॅटचे 2 तुकडे, व्हिडीओ

यॉर्कर खेळायला म्हणून गेला आणि बॅटचे दोन तुकडेच झाले पाहा IPLच्या पहिल्या सामन्यातील व्हिडीओ

Updated: Apr 10, 2021, 11:56 AM IST
IPL 2021 MI vs RCB: यॉर्कर खेळताना बॅटचे 2 तुकडे, व्हिडीओ

मुंबई: भरसामन्यात बॅटचे तुकडे झाल्याचा एक व्हिडीओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. पुन्हा एकदा IPLच्या पहिल्याच सामन्यात असाच एक प्रकार घडला. यॉर्कर बॉल खेळताना बॅटचे दोन अक्षरश: दोन तुकडे झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना सुरू असता कृणाल पांड्या क्रिझवर होता. त्यावेळी 15 कोटीचा लिलाव करून संघात समाविष्ट केलेल्या काइल जेमिनसननं जोरात यॉर्कर टाकला. हा यॉर्कर इतका जबरदस्त होता की तो खेळण्याच्या नादात कृणाल पांड्याची बॅट तुटली. 

लाईव्ह सामन्यात हा प्रसंग घडल्यानंतर सर्वजण दोन मिनिटं हैराण झाले. 6 फूट 8 इंच उंच असणाऱ्या काइल जेमिनसननं टाकलेल्या यॉर्करनं विकेट गेली नाही मात्र बॅट तुटली. भारत विरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात जेमिनसननं डेब्यू केलं होतं. त्यानंतर लिलावात RCB संघानं 15 कोटी देऊन त्याला संघात घेतलं.

हर्षल पटेलनं सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्य़ा नावावर नोंदवला. तर दुसरीकडे ग्लान मॅक्सवेलनं षटकार ठोकला आहे.  20 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन 2 गडी राखत बंगळुरु संघाने विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्स संघानं पहिला सामना हरण्याची परंपरा कायम राखली आहे.