मुंबई: राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्स आणि 9 बॉलने दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स संघातील एक खेळाडूनं आपल्या पत्नीला गालावर किस केल्याचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो जहीर खानची पत्नी सागरिका घाटगेनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील सूर्यकुमार यादव विशेष कामगिरी करण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने केलेल्या एक गोष्टीमुळे तो सध्या चर्चेत आला आहे. सूर्यकुमारने सामन्यात केवळ 16 धावा काढल्या. मॉरिसने त्याला आऊट करत तंबुत धाडलं.
जहीर खानची पत्नी सागरिका घाटगेनं आपल्या इन्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सूर्यकुमार यादवने आपल्या पत्नीला किस केल्याचं दिसत आहे. सूर्यकुमार पत्नी देविशा शेट्टीच्या गालावर तो किस करतो. मात्र त्या दोघांच्याही मध्ये एक काच आल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते देखील खूप भावुक झाले.
राजस्थान संघाला पराभूत करून मुंबई इंडियन्स संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. क्विंटन डी कॉकने नाबाद 70 धावांची खेळी केली. कृणाल पांड्याने 39 धावा केल्या. मुंबई संघाने आतापर्यंत 6 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. पॉइंट टेबलवर मुंबई सध्या चौथ्या स्थानावर आहे.