IPL 2021 : धोनीने पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर आपण आता म्हातारे झालो, असे विधान का केले?

मॅच नंतर घेण्यात आलेल्या प्रजेन्टेशन मध्ये स्वत: धोनीने हे सांगितले आहे.

Updated: Apr 17, 2021, 07:46 PM IST
IPL 2021 : धोनीने पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर आपण आता म्हातारे झालो, असे विधान का केले?

मुंबई : पंजाब किंग्सचा पराभव केल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) म्हणाला की, त्याला आता असे वाटू लागले आहे की, तो आता म्हातारा झाला आहे. मॅच नंतर घेण्यात आलेल्या प्रजेन्टेशन मध्ये स्वत: धोनीने हे सांगितले आहे. धोनी असे का म्हणाले? कोणत्या कारणामुळे असे म्हणाला? या विषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. परंतु त्याआधी, धोनीच्या संघाने पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबईच्या मैदानावर कसा पराभव केला? हे थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात एमएस धोनीने टॅास जिंकून, प्रथम बॅालिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु पंजाब किंग्जसाठी तो दिवस चांगला नव्हता. संघाने 20 ओव्हरमध्ये केवळ 106 धावाच केल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरले. त्यानंतर 4 विकेट्स गमावून  चेन्नई सुपर किंग्जने एकूण 107 धावा केल्या.  चेन्नई सुपर किंग्जने ही मॅच 4.2 ओव्हर शिल्लक ठेऊन 6 विकेट्सने ही मॅच जिंकली आहे. या मॅचचा हीरो फास्ट बॅालर दीपक चहर ठरला त्याने संपूर्ण मॅचमध्ये फक्त 13 रन्स देऊन 4 विकेट्स घेतले.

चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन एमएस धोनीची ही 200 वी मॅच होती, त्यामुळे पंजाब किंग्जविरोधात जिंकलेल्या या मॅचमुळे त्यांच्या विजयाचे महत्त्व आणखीनच वाढते. धोनी सीएसकेसाठी 200 सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. त्याचबरोबर, कोणत्याही एका फ्रेंचायझीसाठी इतके सामने खेळणारा विराट कोहलीनंतरचा तो दुसरा खेळाडू आहे. आता जेव्हा स्पर्धा कारकीर्दीसाठी इतकी खास असेल, तेव्हा निश्चितच त्याबद्दलही प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे धोनीला सीएसकेच्या या 200 व्या मॅचबद्दल विचारले गेले.

200 व्या मॅचनंतर धोनीला म्हातारा झाल्याची भावना

धोनीला जेव्हा या 200व्या मॅच विषयी त्याच्या भावनांबद्दल विचारले गेले तेव्हा सुरवातीला धोनी हसला आणि म्हणाला, "मी म्हातारा झालो आहे असे दिसते." नंतर तो म्हणाला, “हा खरोखर एक लांबचा प्रवास आहे, जो 2008 पासून सुरू झाला. हा प्रवास बर्‍याच टप्प्यातून आणि परिस्थितीतून गेला आहे. भारता व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिके मॅच खेळल्या, दुबईमध्ये खेळल्या. सगळीकडेच खेळायची मज्जा वेगळी आहे. एकंदरीत संपूर्ण प्रवास मजेशीर होता."

सीएसकेसाठी, धोनीच्या 200 व्या मॅचमध्ये जिंकणे अपेक्षित होते, तसेच त्याच्या बॅटिंगमधून स्फोटक खेळही अपेक्षित होता. पहिली इच्छा तर पूर्ण झाली. परंतु त्याचा चांगला खेळ पाहण्याची आशा अपूर्ण राहिली. कारण, स्कोअर बोर्डवर पाठलाग करण्यासाठी जास्त रन्स नव्हते.