IPL 2021 : हिटमॅन रोहित शर्मा जेव्हा बॉलिंग करतो...पाहा व्हिडीओ

 मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना उद्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. 

Updated: Apr 12, 2021, 11:28 AM IST
IPL 2021 : हिटमॅन रोहित शर्मा जेव्हा बॉलिंग करतो...पाहा व्हिडीओ title=

मुंबई: बंगळुरू विरुद्ध झालेला पहिला सामना गमवल्यानंतर मुंबई इंडियन्स संघानं पुन्हा एकदा कंबर कसली आहे. बंगळुरू विरुद्ध 2 विकेट्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये अटीतटीची लढत झाली होती. मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना आता कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. 

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता सामना उद्या संध्याकाळी चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघ कसून सराव करत आहे. या सरावा वेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर बॉलिंग करताना दिसला आहे. याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्स संघाने आपल्या इन्स्टावर शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

कोलकाता नाईय रायडर्स आणि मुंबई इंडियन्सचा उद्याचा सामना खूप रंजक असणार आहे. त्यामुळे या सामन्य़ात कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई इंडियन स्कॉड
रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डिकॉक (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनमोलप्रीत सिंह, आदित्य तारे (विकेटकीपर), कृणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जेम्स नीशाम, युधिवीर चरक, नाथन कोल्टर-नाइल, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन

कोलकाता नाईट रायडर्स स्कॉड
इयोन मॉर्गन, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, आंद्रे रसेल/पॅट कमिन्स, शाकिब अल हसन, वरूण चक्रवर्ती/हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी

सामन्यांचं शेड्युल

17 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संध्याकाळी 7.30 वाजता
20 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs DC) संध्याकाळी 7.30 वाजता
23 एप्रिल- पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) संध्याकाळी 7.30 वाजता
29 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI vs RR)- दुपारी 3.30 वाजता