IPL 2021: सामन्यापूर्वी 'Dear Dilli...' म्हणत श्रेयस अय्यरनं संघाला दिला खास मेसेज

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आज वानखेडे स्टेडियमवर सामन रंगणार आहे. 

Updated: Apr 10, 2021, 04:46 PM IST
IPL 2021: सामन्यापूर्वी 'Dear Dilli...' म्हणत श्रेयस अय्यरनं संघाला दिला खास मेसेज

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आज वानखेडे स्टेडियमवर सामन रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. गुरू महेंद्र सिंह धोनी आणि शिष्ट ऋषभ पंत पुन्हा आमने सामने भिडणार आहेत. यावेळी श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्यानं दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. 

ऋषभ पंतकडे संघाचं नेतृत्व आल्यानंतर दिल्ली संघानं जोरदार कंबर कसली आहे. CSKसंघातील अनुभवी खेळाडूंसमोर युवा जोश टिकवण्यासाठी श्रेयस अय्यरनं व्हिडीओ पोस्ट करून खास मेसेज दिला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयसनं संघाचं मनोबल वाढवलं आहे. 

आपण खूप कठोर मेहनत घेतली आहे. प्रत्येक चेंडू आणि सामन्यात मी तुमच्यासोबत आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या हंगामात त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं होतं. अंतिम सामन्यात हा संघ मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला. चेन्नईची कमान महेंद्रसिंग धोनीकडे आहे. अशा परिस्थितीत पंत आणि धोनी यांच्यात चांगली झुंज पाहायला मिळणार आहे.

Tags: