IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा

दिल्ली संघाची जबाबदारी या युवा खेळाडूच्या खांद्यावर

Updated: Mar 30, 2021, 09:23 PM IST
IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा title=

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापतीमुळे कर्णधार श्रेयस अय्यरला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते. त्यामुळे आता आयपीएलमध्ये देखील खेळणार नाहीये. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capital) संघाचा नवा कर्णधार आता ऋषभ पंत (Rishabh Pant) असणार आहे. दिल्ली कॅपिटल संघाने नुकतीच ट्विटरवर याची घोषणा केली.

दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आयपीएल 2021 मध्ये ऋषभ पंत आमचा कर्णधार असेल. भारत इंग्लंड मालिकेत दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचा कार्यभार स्वीकारेल"

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत जखमी झालेल्या श्रेयस अय्यरची 8 एप्रिलला खांद्यावर शस्त्रक्रिया होईल आणि त्याला मैदानात परत येण्यास किमान 4-5 महिने लागतील. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खेळण्याची शक्यता कमीच आहे.

श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात डावाच्या आठव्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना खांद्याला दुखापत झाली होती. अय्यर या दुखापतीनंतर वेदनांनी विव्हळत होता. त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही.

ऋषभ पंतच्या आधी दिल्ली संघाची जबाबदारी रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथसारख्या खेळाडूंवर होती. पण टीम मॅनेजमेंटने युवा खेळाडूला कर्णधार म्हणून संधी दिली आहे.

आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये अय्यरने दिल्लीच्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. या सीजनमध्ये दिल्लीची पहिली टक्कर 10 एप्रिल रोजी वानखेडे येथे चेन्नई सुपर किंग्जशी (DC vs CSK) होणार आहे.