IPL 2021: जमैका टू इंडिया...नाम मे ही ब्रॅन्ड है! सामन्याआधी ख्रिस गेलचं गाणं रिलीज

वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर नुकतच गाण आलं आहे. 

Updated: Apr 12, 2021, 12:33 PM IST
IPL 2021: जमैका टू इंडिया...नाम मे ही ब्रॅन्ड है! सामन्याआधी ख्रिस गेलचं गाणं रिलीज title=

मुंबई: वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर नुकतच गाण आलं आहे. जमैका टू इंडिया हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ख्रिस गेल नाम मे ही ब्रॅन्ड है म्हणत या गाण्यात तो तरुणींसोबत डान्स करतानाही दिसत आहे. IPLची रणधुमाळी सुरू असताना ख्रिस गेलच्या या गाण्यानं सोशल मीडियावर पुरता धुमाकूळ घातला आहे. 

 पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज सामना रंगणार आहे. या सामन्याआधी त्याचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 'जमैका टू इंडिया' रिलीज होताच काही वेळात त्याला तुफान लाईक्स मिळाले आहेत. प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाय याने हिंदी आणि इंग्रजी दोन्ही एकत्र करून ख्रिस गेलबद्दल सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KingGayle (@chrisgayle333)

ख्रिल गेल वेस्ट इंडिजचा विस्फोटक गोलंदाज आहे. त्याच्या फलंदाजीनं मैदानात तुफान येतं. पंजाब किंग्स संघाकडून खेळणार आहे. त्याला युनिवर्स बॉस या नावानंही ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी त्याने मून वॉकचा व्हिडीओ शेअर केला आहे.