पृथ्वीचा फोटो स्टेटसवर ठेवत गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज

सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा 

Updated: Apr 26, 2021, 04:42 PM IST
पृथ्वीचा फोटो स्टेटसवर ठेवत गर्लफ्रेंडनं लिहिला खास मेसेज title=

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये मात दिली. या सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने 39 चेंडूत 53 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने एका ओव्हरमध्ये सीक्स आणि सात चौके लगावले. (IPL 2021: Prithvi Shaw rumoured girlfriend Prachi Singh has special message for DC opener after his exploits vs CSK)  पृथ्वीच्या या तुफानी खेळाकरता मॅन ऑफ द मॅच देखील मिळाला आहे. 

प्राचीने इंस्टाग्रामवर केली पोस्ट 

पृथ्वी शॉची चर्चेत असलेली गर्लफ्रेंड प्राची सिंह त्याच्या बॅटिंगची फॅन झाली आहे. त्याच्या या यशात प्राची देखील आनंदी आहे. तिने इंस्टाग्रामवर स्टोरीवर पृथ्वीचा फोटो लावून हार्ट अशी इमोजी पोस्ट केली आहे. प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ यांच्या डेटिंगची चर्चा धाली मात्र अद्याप या दोघांनी कोणतीच कबुली दिलेली नाही. मात्र प्राची सिंह कायमच आपल्या पोस्टमधून हे प्रेम व्यक्त करत असते.  

कोण आहे प्राची सिंह? 

आयपीएलचे 2020 सिझन दरम्यान प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. तेव्हापासून प्राची सिंह खूप चर्चेत आली. प्राची सिंह कलर्स टीव्ही शोवरील 'उडान' दरम्यान वंशिक शर्माची भूमिका साकारली आहे. या शो दरम्यान 2019 मध्ये सहभागी झाली. 

हैदराबादविरुद्ध पृथ्वी शानदार फॉर्मात होता. त्याने केवळ 39 चेंडूत 53 रन्स काढले. या खेळीत त्याने खणखणीत 7 चौकार लगावले तर 1 उत्तुंग षटकार खेचला. रिषभ पंतच्या चुकीमुळे फॉर्मात असलेल्या पृथ्वीला तंबूत जावं लागलं. पृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली. पृथ्वीने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली.