चेन्नई : आयपीएल 2021मधील आजची पहिली मॅच चेन्नईतील चेपॉक स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि कोलकाता नाइट राइडर्स (KKR) मध्ये खेळली गेली. ही मॅच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आपल्या नावे करुन सलग तिसऱ्यांदा मॅच विजय नोंदवला. प्रथम बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या विराटच्या टीमने 205 धावांचं लक्ष कोलकाता नाइट राइडर्स (KKR) समोर ठेवलं. परंतु कोलकाता 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करु शकले.
या मॅचमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 6 पॉइंट्सने स्कोर टेबलच्या पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर, कोलकाताने आपल्या 3 मॅचपैकी ही दुसरी मॅच गमावून स्कोर टेबलवर सहाव्या स्थानावर आहे.
टॉस जिंकून प्रथम बॅटींगसाठी मैदानात उतरलेली आरसीबीची टीम सुरवातीला चांगला खेळ खेळू शकली नाही. मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये कोहली पाठोपाठ आणखी 2विकेट पडले. परंतु यामुळे टीमवर काहीही फरक पडला नाही.
ग्लेन मॅक्सवेलने टीमसाठी 78 धावा करुन सीझनमध्ये सलग दुसरा अर्ध शतक मारला. त्यानंतर डिव्हिलीयर्सने नाबाद 76 धावा करुन स्कोअर बोर्डवर 204 धावा लावल्या. त्याने या धावा फक्त 34 बॅाल्समध्ये केल्या आणि आपला 360 डीग्री खेळ दाखवला. त्याच्या या खेळीमुळे कोलकाता नाइट राइडर्स समोर मोठं लक्ष उभं राहिलं.
Smart Cricket Batsman of The Match Cricket
Today's pick is this clever shot from the irresistible AB de Villiers!
Mr 360 was in stunning form as his 76* (34) helped #RCB post a daunting total! #SmartCricketBatsmanOTM #SmartCricket #IPL2021 #RCBvKKR pic.twitter.com/kchs3EX6ZY
— SmartCricket.com (@SmartCricket19) April 18, 2021
डिव्हिलीयर्सच्या या 360 डीग्री खेळामुऴे लोकं त्याचं खूप कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे.