IPL 2021: Rohit Sharma पहिली मॅच हरला असला, तरी त्याच्या शूजवरील मॅसेजने मात्र सगळ्यांची मनं जिंकली...

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आरसीबीच्या पहिल्या सामन्यात 2 विकेटने पराभव पत्करावा लागला, परंतु हिटमॅन रोहितने आपल्या शूजवर लिहिलेला एका खास मॅसेजने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Updated: Apr 11, 2021, 04:08 PM IST
IPL 2021: Rohit Sharma पहिली मॅच हरला असला, तरी त्याच्या शूजवरील मॅसेजने मात्र सगळ्यांची मनं जिंकली...

चेन्नई : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आरसीबीच्या पहिल्या सामन्यात 2 विकेटने पराभव पत्करावा लागला, परंतु हिटमॅन रोहितने आपल्या शूजवर लिहिलेला एका खास मॅसेजने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध रोहित शर्मा जेव्हा बॅटिंगसाठी मैदानावर आला, तेव्हा त्याच्या शूजवर लिहिलेला तो खास मॅसेज सगळ्यांना दिसला, त्यानंतर रोहितचे खूप कौतुक होत आहे.

रोहित शर्माच्या शूजवर 'सेव द रायनो' असा मॅसेज लिहिण्यात आला होता. जी गेंडा वाचवण्याची मोहीम आहे. रोहित शर्माच्या शूजवर शिंगं असलेल्या गेंडाचे चित्र होते. लुप्त झालेल्या गेंडाच्या प्रजातींच्या संरक्षणासाठी रोहित फलंदाजी करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

या आयपीएलमध्ये रोहितने एक शिंग गेंडा असो किंवा भारतीय गेंडा त्यांच्या संरक्षणासाठी ही खास पद्धत अवलंबली आहे.