IPL 2021: डेव्हिड वॉर्नरला आऊट होताच अजब पद्धतीनं डान्स करायला लागला खेळाडू

बिहू डान्सनंतर क्रिकेटच्या मैदानात पंजाब किंग्सच्या खेळाडूचा अजब डान्स तुफान व्हायरल

Updated: Apr 22, 2021, 10:01 AM IST
IPL 2021: डेव्हिड वॉर्नरला आऊट होताच अजब पद्धतीनं डान्स करायला लागला खेळाडू title=

मुंबई: फलंदाज आऊट झाल्यानंतर बिहू डान्स करणाऱ्या रियान पराग सर्वांनाच परिचयाचा आहे. या रियाननंतर आता पंजाब संघातील एका ऑलराऊंडर खेळाडूनं अजब डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल माडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हैदराबाद संघाने पंजाब विरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. सलग तीन वेळा पराभवाचा सामना केल्यानंतर हैदराबाद संघाने पंजाबवर जबरदस्त विजय मिळवला आहे.

डेव्हिड वॉर्नरने 37 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. त्याच्या तुफान फलंदाजीला ब्रेक लावत त्याला तंबुत माघारी धाडण्याचं काम फॅबियन एलन आणि मयंक अग्रवालनं केलं. मयंकने कॅच पकडत डेव्हिडला आऊट केल्यानंतर एलननं जो डान्स केला तो पाहून लोकांना हसू आवरेनासं झालं. त्याच्या या अजब डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबाद संघाने पंजाबला पराभूत केलं. डेव्हिड वॉर्नला आऊट केल्यानंतर फॅबियननं जबरदस्त डान्स केला. तीन सामने सलग पराभव स्वीकारल्यानंतर हैदराबादला पंजाब विरुद्धचा सामना जिंकण्यात पहिल्यांदा यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 

राजस्थान संघातील रियान पराग देखील अशाच पद्धतीने विकेट काढल्यानंतर बिहू डान्स करताना दिसतो. त्यामुळे त्याचीही सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते.