अखेर IPL 2021 ला कोरोनाने गाठलं, पुढचे सामने स्थगित

IPL 2021 अखेर स्थगित! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCIचा महत्त्वपूर्ण निर्णय

Updated: May 4, 2021, 01:42 PM IST
अखेर IPL 2021 ला कोरोनाने गाठलं, पुढचे सामने स्थगित

मुंबई: देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व काळजी घेऊन सुरू असलेली आयपीएल अखेर स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BCCIने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संघातील 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलचे पुढचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. 

BCCIचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली आहे. कोलकाता संघातील 2 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर हैदराबाद संघातील एका खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

चेन्नई सुपर किंग्जचे CEO काशी विश्वनाथन, गोलंदाजांचे प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्या दरम्यान CSKचे बॉलिंग कोच मुंबई संघातील काही लोकांच्या संपर्कात आले होते.

​दुसरीकडे बीसीसीआयने दिल्ली संघाला क्वारंटाइन राहण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी कोलकाता संघातील संदीप वॉरियर आणि वरूण चक्रवर्ती या दोघांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित करण्यात आला होता.