कॅप्टन कूल धोनीची खास दोस्ताला रॉयल ट्रिटमेंट, पत्नी साक्षीने शेअर केला व्हिडीओ

कॅप्टन कूल धोनीचा प्रेमळ हात अंगावरून फिरल्यानंतर चेतकलाही खूप बरं वाटत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Updated: May 28, 2021, 09:25 AM IST
कॅप्टन कूल धोनीची खास दोस्ताला रॉयल ट्रिटमेंट, पत्नी साक्षीने शेअर केला व्हिडीओ

मुंबई: IPLमध्ये कोरोना शिरल्यानंतर उर्वरित 31 सामने स्थगित झाले. त्यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. कॅप्टन कूल धोनी सध्या आपली घरी परतला असून तो प्राण्यांसोबत वेळ घालवत आहे. त्याच्या घरात चेतक नावाच्या घोड्याचं आगमन झाल्यानंतर बराचसा वेळ धोनी त्याच्यासोबत घालवत असतो. साक्षीने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

कॅप्टन कूल धोनीचा प्रेमळ हात अंगावरून फिरल्यानंतर चेतकलाही खूप बरं वाटत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. माही चेतकच्या अंगावरून प्रेमानं हात फिरवत आहे. चेतक गार्डनमध्ये अडवा झोपल्याचं दिसत आहे. धोनीची पत्नी साक्षीने चेतक आणि श्वानांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

IPL 2021 उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंड सीरिजमध्ये बदल? ECB ने केला खुलासा

धोनीला पाळीव प्राणी खूप आवडतात. धोनीने अनेक श्वान आपल्या घरी पाळले आहेत. याखेरीज आता  आपल्या घरी एक घोडा देखील आणला आहे. ज्याचं नाव चेतक असं आहे. धोनी सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव नाही. धोनीऐवजी साक्षीने त्याचे अनेक व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून पोस्ट केले आहेत. यापूर्वीही धोनी आपल्या श्वानांसोबत खेळतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.