मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू एकीकडे इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी गेले आहोत. तर दुसरीकडे BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली (दादा) आयपीएलचे उर्वरित सामन्यांचं नियोजन करण्यासाठी UAEमध्ये काही दिवसांपूर्वी गेले होते. तिथे क्वारंटाइन संपल्यानंतर त्यांनी कामासोबतच काही गोष्टी केल्या ज्यामुळे ते ट्रोल झाले आहे. कोरोना काळात कामासोबत दादाने कार रेसिंगची देखील मजा घेतली. त्यावरून सोशल मीडियावर आता चर्चा रंगली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कार रेसिंग करून आल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये दादा लाला रंगाचा ट्रॅकसूट आणि हेल्मेट अशा अवतारात आहेत. जो कार रेसिंगसाठी वापरला जातो. त्यांच्या या फोटोवर सोशल मीडियावर खूप टीका झाल्यानंतर त्यांनी फोटो डिलिट केला आहे. मात्र त्यामुळे सोशल मीडियावर जास्तच चर्चा रंगली.
सौरव गांगुली यांनी फोटो शेअर करत म्हटलं होतं की आज कार रेसिंग केलं. त्यावर चाहत्यांनी त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असंही सल्ला अनेक चाहत्यांनी आणि युझर्सनी दिला तर काहींनी कोरोनाची भयावह स्थिती असताना अशा पद्धतीनं काही केल्यानं टीका देखील केली.
एका युझरने त्यांच्यावर टीका करत म्हटलं की 'अशी मूर्खपणाची कामं करण्यापेक्षा काहीतरी चांगली कामं करा'. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्यावर टीका झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी हा फोटो सोशल मीडियावरून डिलिट केला आहे.