बायकोसमोर टीम इंडियाच्या कॅप्टनने अखेर असे गुडघे टेकले, तुमचं काय होणार?

अखेर अनुष्का ठरली वरचढ, विराटने अनुष्कासमोर असे गुडघे टेकले

Updated: Jun 6, 2021, 02:33 PM IST
बायकोसमोर टीम इंडियाच्या कॅप्टनने अखेर असे गुडघे टेकले, तुमचं काय होणार?

मुंबई: बायको ती बायकोच म्हणतात ते खरं आहे. कारण जिथे टीम इंडियाच्या कर्णधाराचा निभाव लागला नाही तिथे तुमची काय गतं नाही का? टीम इंडिायाचा कर्णधार विराट कोहलीलाही आपल्या बायकोसमोर गुडघे टेकण्याची वेळ आली आहे. आता ही गोष्ट बाहेर आली ती म्हणजे भारतीय महिला संघातील ऑलराऊंडरने याबाबत खुलासा केला आहे. विराटला का गुडघे टेकावे लागले आणि नेमका काय खेळाडूनं केलेला खुलासा काय आहे जाणून घेऊया.

टीम इंडियाचे खेळाडू सध्या साउथेप्टन इथे क्वारंटाइन आहेत. तीन दिवस कडक क्वारंटाइन पाळण्यात आला आहे. खेळाडूंना एकमेकांना भेटण्याची परवानगी देखील देण्यात आली नाही. तर याच दरम्यान सर्वांनी आपले रूममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अभिनेत्री अनुष्का शर्मा वामिकाला घेऊन विराटसोबत इंग्लंड दौऱ्यासाठी गेली आहे. अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमागे स्टेडियम दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताच त्यावर भारतीय महिला संघातील ऑलराऊंडर खेळाडूनं मजेशीर कमेंट केली आहे. या कमेंटनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

या खेळाडूनं कमेंटमध्ये म्हटलं आहे की विराट कोहली हा खूप सुंदर फोटो काढला आहे. हरलीननं म्हटलं की हा फोटो काढण्यासाठी गुडघ्यावं बसावं लागलं. या फोटोमध्ये त्याचं डेडिकेशन दिसतं आहे. असं म्हणत तिने हसण्याचे इमोजी टाकले आहे. विराट कोहलीचं नाव न घेता तिने सूचकपणे हे विधान केलं आहे. पत्नीचा फोटो काढण्यासाठी कोहली गुडघ्यावर बसला होता हे तिला यातून सूचित करायचं होतं. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.