मुंबई : आपीएल आता त्याच्या मध्यापर्यंतर पोहचणार तोच त्याला कोरोनाचं ग्रहण लागायला सुरवात झाली आहे. सुरवातीला कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपीएलमधून काही खेळाडूंनी माघार घेतली आहे. तर आता भारतीय अंपायर नितीन मेनन आणि ऑस्ट्रेलियन अंपायर पॉल राफेल हे आपल्या वैयक्तिक कारणास्तव आपीएलमधून माघार घेत आहेत.
अंपायर नितीन मेनन यांची पत्नी आणि त्यांची आई कोविड पॅाझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे आणि म्हणूनच त्यांनी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एलिट पॅनेलमधील मेनन हे एकमेव भारतीय आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या सीरीजमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दलं त्यांचे खूप कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, "नितीन त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोविड -19 मुळे संक्रमित झाल्यामुळे ते आयपीएलमधून माघार घेत आहेत. सध्या ते सामनाचे संचालन करणाच्या मनं स्थितीत नाहीत."
भारतातील कोविड -19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे, भारतातून ऑस्ट्रेलियाच्या प्रवासावरील बंदी घातली गेली, ज्यामुळे पॉल राफेलनेही आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मेनन आयपीएलमधून माघार घेणारे दुसरे भारतीय आहे. त्यांच्या अगोदर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने घरातील सदस्यांना संसर्ग झाल्यानंतर घरी परतण्याचा निर्णय घेतला होता.
भारतातील कोरोनाच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियाचा अॅन्ड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि एडम जाम्पा हे आयपीएल बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने असे आश्वासन दिले आहे की, खेळाडू आणि सहाय्य करणारे कर्मचारी हे सुरक्षित वातावरणात आहेत. मेनन आणि राफेलच्या जागी बीसीसीआय आपल्या अंपायर पूलमधून नवीन अंपायर नियुक्त करू शकतील.