IPL 2022 , LSG vs SRH | लखनऊ विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण मारणार बाजी?

 आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 12 वा  सामना आज ( 4 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जांयट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने असणार आहेत.   

Updated: Apr 4, 2022, 05:56 PM IST
IPL 2022 , LSG vs SRH | लखनऊ विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण मारणार बाजी? title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 12 वा  सामना आज ( 4 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जांयट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने असणार आहेत. या मॅचचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. (ipl 2022 12 th match srh vs lsg sunrisers hyderabad vs lucknow super giants predicted playing  11)

लखनऊचा  हा या मोसमातील तिसरा सामना आहे. लखनऊने या आधीच्या 2 सामन्यातून एका सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊला गुजरात टायटन्सने 5 विकेट्सने पराभूत केलं होतं. 

तर दुसऱ्या सामन्यात लखनऊने चेन्नईला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात चेन्नईवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. 

तर दुसऱ्या बाजूला सनरायजर्सचा हा या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. हैदराबादला आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थानने  61 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबाद आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे.

अशी असू शकते दोन्ही टीमची संभावित प्लेइंग इलेव्हन

लखनऊ सुपर जायंट्स | 

केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, इविन लुईस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, दुश्मंथा चमीरा, रवी बिश्ननोई आणि आवेश खान. 

सनराइजर्स हैदराबाद |

केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, अब्दुल समद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि टी नटराजन.