IPL 2022, CSK vs KKR | 'जितबो रे'! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.  

Updated: Mar 26, 2022, 11:21 PM IST
IPL 2022, CSK vs KKR |  'जितबो रे'! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय title=
फोटो सौजन्य : आयपीएल ट्विटर

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. कोलकाताने 15 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईवर (CSK) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह आयपीएलमधील मोहिमेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 18.3 ओव्हर्समध्येच 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळा अंजिक्य रहाणे (Ajinkya Rahane) या विजयाचा हिरो ठरला. (ipl 2022 1st match csk vs kkr kolkata knight riders beat chennai super kings by 6 wickets ajinkya rahane shine at wankhede stadium mumbai)

अजिंक्य रहाणेच्या 44 धावा

कोलकाताकडून लोकल बॉय अंजिक्य रहाणेने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. व्यंकटेश अय्यर 16 धावा करुन माघारी परतला.  सॅम बिलिंग्सने 25 रन्स केल्या. नितीश राणाने 21 धावांचं योगदान दिलं. 

तर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि शेल्डॉन जॅक्सन या जोडीने कोलकाताला विजयापर्यंत पोहचवलं. कॅप्टन श्रेयसने नाबाद 20 धावा केल्या. तर  शेल्डॉनने नॉट आऊट 3 रन केल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने 3 तर मिचेल सँटनरे 1 विकेट घेतला.

चेन्नईची बॅटिंग

दरम्यान त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. चेन्नईकडून महेंद्रसिंह धोनीने (Mahedra Singh Dhoni )  सर्वाधिक नाबाद 50 रन्स केल्या. 

तर कॅप्टन रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) 26 धावांची संयमी खेळी केली. कोलकाताकडून उमेश यादवने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
 
कोलकाता नाईट रायडर्सचे अंतिम 11 खेळाडू - श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

सीएसकेची प्लेइंग इलेव्हन - रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर आणि एडम मिल्न.