आयपीएलमध्ये कोरोनाचा 'चौकार', आता काय पुढे काय होणार?

Corona Update : आणखी तिघांना कोरोना, आयपीएल रद्द करण्याची तीव्र मागणी, लीग रद्द होणार?

Updated: Apr 19, 2022, 11:08 AM IST
आयपीएलमध्ये कोरोनाचा 'चौकार', आता काय पुढे काय होणार? title=

मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी क्रीडा विश्वातून येत आहे. अखेर ज्याची भीती होती तेच घडलं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोरोनाची एन्ट्री झाली. दिल्ली कॅपिटल्स टीममध्ये कोरोना घुसला आहे. आता एकूण 4 खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

दिल्ली स्टार ऑलराऊंडर ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह आढळला.  सोमवारी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

याशिवाय स्पोर्ट स्टाफमधील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 20 एप्रिल रोजी होणाऱ्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यावर कोरोनाचं संकट आहे. हा सामना होणार की नाही याबाबत अद्याप कोणातीह निर्णय झाला नाही.

कोरोना केसेस वाढत असल्याने आयपीएलचे सामने रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. अनेकांनी टुर्नामेंट रद्द करावी अशी मागणी केली आहे. आयपीएलच्या नव्या नियमानुसार 9 खेळाडूंमध्येही सामना खेळवला जाणार असं सांगितलं होतं. मात्र आता दिल्लीचा सामना स्थगित होणार का याकडे लक्ष आहे. 

दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक मार्शच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दिल्लीने ट्वीट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. BCCI आता काय निर्णय घेतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.