मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) मोठया धडाक्यात सुरुवात झाली. आतापर्यंत प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला आहे. या दरम्यान आता क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. कोरोनामुळे स्टेडियममध्ये (ipl crowd capacity) फक्त 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. या प्रेक्षक संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. (ipl 2022 50 percent crowd capacity allowed in stadium after all covid restrictions in maharashtra will be lifted)
राज्य सरकारने 31 मार्चला महाराष्ट्रातील सर्व कोरोना निर्बंध (Maharashtra Unlock) शिथिल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता स्टेडियममधील प्रेक्षक संख्या ही 25 टक्क्यावरुन 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. आयपीएलची अधिकृ तिकीट पार्टनर बुक माय शोने याबाबतची घोषणा केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.
कोरोना आल्यापासून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांचीच परवानगी देण्यात आली होती. आयपीएलचे गेले 2 मोसम खबरदारी म्हणून बंद दाराआड खेळवण्यात आले होते.
मात्र आता राज्य सरकारने निर्बंध पूर्णपणे शिथिल केले. त्यामुळे या प्रेक्षक संख्येत 25 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आता स्टेडियमच्या 50 टक्के परवानगी असणार आहे.