IPL 2022 : सर्व निर्णय धोणीचे, मग जडेजा काय करतो? या दिग्गज खेळाडूंची नाराजी

धोणी की जडेजा, नक्की कॅप्टन कोण? का होतेय अशी चर्चा

Updated: Apr 1, 2022, 05:47 PM IST
IPL 2022 : सर्व निर्णय धोणीचे, मग जडेजा काय करतो? या दिग्गज खेळाडूंची नाराजी title=

IPL 2022 : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा हंगाम सुरु होऊन आता आठवडा पूर्ण होईल. नवा हंगाम, नवे खेळाडू आणि नव्या कॅप्टनसह सर्वच टीम मैदानात उतरल्या. आयपीएलमधला दुसरी यशस्वी टीम असलेली चेन्नई सुपर किंग्सही (CSK) नव्या दमाने, नव्या कॅप्टनसह मैदानात उतरली. पण दोन सामन्यांनंतरही टीमला सूर काही सापडलेला नाही.

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा 15वा हंगामाची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. चार वेळच्या चॅम्पियन टीमला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. नवीन कर्णधार रवींद्र जडेजाच्या (Ravinddra Jadeja) नेतृत्वाखाली गतविजेती टीम पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. 

पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) तर दुसऱ्या सामन्यात नवख्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. पण या सामन्यादरम्यान माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पूर्वीप्रमाणेच सक्रिय दिसला आणि बहुतांश निर्णय तो स्वत:च घेताना दिसला. तर कॅप्टन रविंद्र जडेजा पूर्ण सामन्यात काहीसा बाजूला झालेला दिसला.

दिग्गज खेळाडूची नाराजी
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा धोनीच्या या वृत्तीवर चांगलाच संतापला. जर तुम्ही एखाद्याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केलं असेल आणि असं असूनही तुम्ही सामन्यातील सर्व निर्णय स्वतः घेत असाल तर ते चुकीचे आहे, असं जडेजाने म्हटलं आहे. 

माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलनेही धोनीच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. 'जर तुम्ही स्वतः कर्णधारपद सोडलंय, तर जडेजाला निर्णय घेऊ द्या, त्याला शिकू द्या, तरच तो अधिक चांगले करू शकेल,' असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे. 

पराभवाचं खापर क्षेत्ररक्षणावर
सामन्यानंतर रवींद्र जडेजाने पराभवाचं खापर क्षेत्ररक्षणावर फोडलं. आमची फलंदाजी चांगली होती पण क्षेत्ररक्षणात आम्ही कमकुवत होतो, आम्ही कॅच सोडले त्यामुळे आम्ही सामना गमावला, अशी प्रतिक्रिया रविंद्र जडेजाने व्यक्त केली.